बर्मिंगहम :– एखाद्या खाद्यपदार्थाची किंमत अव्वाच्या सव्वा लावली तर कोणालाही आश्चर्य वाटेल आणि त्याबाबत अनेक नागरिक नाराजी व्यक्त करतील. अशीच एक बाब इंग्लंड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धे दरम्यान उघडकीस आली. कॉमनवेल्थ स्पर्धा होणाऱ्या ठिकाणी खाद्यपदार्थांची अव्वच्या सव्वा असणारी किंमत आकारली जात असल्याचे समोर आले आहे.

एका नेटकऱ्याने एका सॉसेजसह फ्रेंच फ्राईसची किंमत जवळपास 10 पाऊंड म्हणजे 1000 भारतीय रुपये इतकी असल्याची पोस्ट केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.

इंग्लंडच्या बर्मिंगहम शहरात 28 जुलै ते 8 ऑगस्टमघ्ये कॉमनवेल्थ गेम्स 2022 ही स्पर्धा पार पडत आहे. जगभरातील विविध देशातून खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंघहममध्ये आले आहेत. खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकही विदेशातून याठिकाणी आले आहेत. अशामध्ये या ठिकाणी गोष्टींची किंमत अधिक असण्याची शक्यता आहे. पण बाहेरच्या किंमतीपेक्षा तीन पटीने किंमत असल्याने नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. मॅथ्यू विल्यम्स या युजरने या फ्रेंच फ्राईज आणि सॉसेजचा फोटो पोस्ट करत त्याची किंमत सांगितली. या फ्राईज आणि सॉसेजची क्वॉलीटी अप्रतिम असल्याचेही सांगितले. ज्यानंतर नेटकऱ्यांनी देखील आपला संताप व्यक्त करत विविध कमेंट्स केल्या.
यात एकाने लिहिले की, ‘काय अप्रतिम आहे यात, सर्वात महाग सॉसेज असण्याचा पुरस्कार मिळाला आहे का?, दुसऱ्याने लिहिले ‘ही तर चोरी आहे. तर एकाने ‘हे फ्राईज नसून सफरचंदाच्या फोडी वाटत आहेत असे लिहिले. इंग्लंडमध्ये या खेळांदरम्यानही प्रेक्षकांची एकप्रकारे लूट होत असल्याचे दिसून येत आहे.
https://twitter.com/Matthew23732409/status/1553075560741478406?t=_bf3oE6oDrOvrb5l2-Je1Q&s=19