पेठ रोड वरील तवली फाट्यावर बिबट्याच्या हल्ल्यात 1 जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी) :– पेठ रोड येथील तवली फाटा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये 46 वर्षीय इसम जखमी झाला आहे. यामुळे अजूनही नाशिक आणि परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे.

याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आज ही घटना घडली आहे असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. बुधवारी तवली फाटा येथे असलेल्या शिवाचारय आत्मध्यान फाउंडेशन या परिसरामध्ये राहणारे बाळासाहेब जाधव या 46 वर्षीय व्यक्ती वर बिबट्याने हल्ला केला.

या हल्ल्यात बाळासाहेब जाधव यांच्या डाव्या हातास तीन दात लागले आहे तर नका मारल्याने ते जखमी झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुढील पावले उचलले असून बिबट्याच्या शोधा साठी वनविभागाचे एक पथक काम करत असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!