येवले (दीपक सोनवणे) :- शहरात बच्चू हलवाई खूंट येथे विधाते पैठणी हे दुकान चोरट्यांनी फोडले असून दुकानातून 12 महागड्या पैठणी साड्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला शहरातील बच्चू हलवाई खूंट येथे विधाते पैठणी या दुकानाच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकामाच्या जिन्यातून चोरट्यांनी विधाते पैठणी या दुकानात प्रवेश केला. सुरुवातीला दुकानाचा दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश करत दुकानातील 12 महागड्या पैठणी साड्या चोरून नेल्या. या साड्यांची अंदाजित 49 हजार रुपये किमतीच्या साड्या चोरट्याने लंपास केल्या.

या संदर्भात दुकान मालक यांच्या तक्रारीवरून येवला शहर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येवला शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक शिरूड हे करीत आहेत.