इंदूर: मध्य प्रदेश इंदूरमध्ये बेलेश्वर मंदिरातील विहिरीवरील छत पडल्यानंतर झालेल्या दुर्घटनेतील धक्कादायक माहिती समोर आली आहे, या दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. रामनवमीनिमित्त मंदिरात पूजा सुरु असताना ही
दुर्दैवी घटना घडली.
दरम्यान या घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश इंदूरमध्ये बेलेश्वर मंदिरातील विहिरीवरील छत पडल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे.
रामनवमीनिमित्त मंदिरात पूजा सुरु असतानाच ही घटना घडाली आहे. इंदूरमधील या दु:खद घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर जखमींना 50,000 हजाच्यां मदतीची घोषणा केली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी रामनवमीनिमित्त मंदिरात भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळीही यज्ञ केला जात होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. मंदिरात लोक पूजा करत होते.
यावेळी मंदिरात असलेल्या विहिरीवर दहा वर्षांपूर्वी छत टाकण्यात आलं होतं. पूजेच्या वेळी 20 ते 25 लोक विहिरीच्या छतावर उभे होते, त्याच वेळी छत खचलं आणि सुमारे 20 ते 25 जण विहिरीत पडले. विहीर सुमारे 50 फूट खोल असल्याचं सांगण्यात येत आहे.