एसटी बस नर्मदा नदीत कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू, इतर प्रवाशांचा शोध सुरू

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :-  मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

बसमध्ये एकूण 40 प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. टुल लेन पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच इंदोर आणि धार येथून एनडीआरएफची पथके मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.

अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होती. हा अपघात इंदोरपासून 80 कि.मी. अंतरावर असलेल्या धार येथे घडला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटना घडल्यानंतर पुलावर बघ्यांनी गर्दी केल्याने वाहतूक खोळंबली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!