Nashik Crime : प्रेयसीच्या विरहामुळे 18 वर्षीय प्रियकराची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी) :- प्रेयसीच्या विरहामुळे व्यथित झालेल्या प्रियकराने पत्र्याच्या रूममधील लोखंडी पाईपला पंचाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली.

याबाबत माहिती अशी, की नागेश जय मोरे (वय 18, रा. ब्राह्मणपुरा, ता. शेगाव, जि. बुलढाणा, ह. मु. अशोकस्तंभ, नाशिक) हा नोकरी-व्यवसायानिमित्त नाशिकमध्ये आलेला होता. तो अशोकस्तंभ परिसरात मित्रांसमवेत राहत होता. काल त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर एकमेकांची विचारपूस झाल्यानंतर नागेशचे वडील आणि त्याचा मित्र नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले होते. ही संधी साधून त्याने हे पाऊल उचलले असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी नागेशच्या मैत्रिणीने आत्महत्या केली होती.

ही घटना ताजी असतानाच प्रेयसीच्या विरहाने व्यथित व झाल्यामुळे व नैराश्य आल्यामुळे त्याने राहत्या घराच्या बाथरूमच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या रूममध्ये असलेल्या लोखंडी पाईपाला पंचाच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर गौरव संतोष बोरचाटे (वय 18, रा. ब्राह्मणपुरा, ता. शेगाव, जि. बुलढाणा, ह. मु. अशोकस्तंभ, नाशिक) याने नागेशला औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक महाले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!