नाशिक शहरातून दोन मुलींसह एका मुलाचे अपहरण

नाशिक (प्रतिनिधी) :- शहर परिसरात अपहरणाच्या वेगवेगळ्या प्रकारांत दोन मुलींसह एका मुलाचे अपहरण करण्यात आल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अपहरणाचा पहिला प्रकार अंबड परिसरात घडला. फिर्यादी यांची मुलगी 16 मे रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास घरी असताना कोणी तरी अज्ञात इसमाने तिला काही तरी आमिष दाखविले व फूस लावून फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

अपहरणाचा दुसरा प्रकार अंबड हद्दीतच घडला. फिर्यादी महिलेच्या घरी बहिणीची मुलगी ही आली होती. ही मुलगी काल सकाळी घरी असताना अज्ञात इसमाने तिला कशाचे तरी आमिष दाखविले, तसेच तिला फूस लावून फिर्यादी महिलेच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.

अपहरणाचा तिसरा प्रकार सातपूर एमआयडीसीत घडला. फिर्यादी मानसी राजेश गांधी (वय 48, रा. किया शोरूमशेजारी, सातपूर एमआयडीसी, नाशिक) यांचा मुलगा हा काल सकाळी 8 वाजता घरात अभ्यास करीत होता. अभ्यास करीत असताना तो घराबाहेर कोणाला काही न सांगता कुठे तरी गेला. तो अद्याप परत आला नाही. त्याचा आजूबाजूला, तसेच मित्रांकडे तपास केला असता तो मिळून आला नाही. त्याला कोणी तरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आल्याने सातपूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!