कंपनीत काम करतांना पत्र्यावरून पडल्याने २ कामगारांचा मृत्यू

 

इगतपुरी (प्रतिनिधी) :- इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जवळ असणाऱ्या फॅब कंपनीत झालेल्या दुर्घटनेत २ कामगारांचा मृत्यू झाला आहे.

आज रात्री 7.45 वाजता झालेल्या ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड हे अपघातस्थळी दाखल झाले. मात्र संबंधित कामगार जागीच मृत असल्याने उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ह्या घटनेमुळे कामगारांची सुरक्षितता धोक्यात आला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जवळ असणाऱ्या फॅब कंपनीत पत्र्याचे काम करणारे कामगार मोहम्मद सानु खान (वय २८), मोहम्मद अनास (वय २१, मूळ राहणार उत्तरप्रदेश) हे दोघे काम करत होते. आज रात्री पावणेआठच्या दरम्यान अचानक पत्रा तुटल्याने ते खाली पडले. जास्त उंचावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती समजताच वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार आणि सहकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन तपासकार्य सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!