दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या 21 जणांची सुटका; तर एक पर्यटक वाहून गेला

नाशिक (प्रतिनिधी) :- दुगारवाडी धबधब्यावर काल सुटी असल्याने 22 पर्यटक आले होते. त्यापैकी 21 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली असून, एक पर्यटक वाहून गेला आहे. त्याचा शोध अद्यापही सुरू आहे.

दुगारवाडी धबधबा पर्यटकांसाठी संध्याकाळी 5 वाजता बंद करण्यात येतो. सुमारे दीड तासात सर्व पर्यटक वर येत असतात. मात्र काल त्यानंतरही दोन दुचाकी वाहन तळावर दिसल्याने वनविभागाच्या 6 कर्मचार्‍यांची एक टीम खाली गेली. खाली गेल्यावर तिकडे काही पर्यटक अडकल्याचे आढळले. त्यांच्यापैकी चार जणांची सुटका काचुर्लीच्या गावकर्‍यांनी केलेली होती. नंतर आणखी पाच जणांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. शेवटी आणखी 12 जण अडकल्याचे व एक जण वाहून गेल्याचे समजल्याने ही रेस्क्यु मोहीम गावकर्‍यांच्या मदतीने वनविभागाच्या पथकाने सुरूच ठेवली होती.

आठ वाजता सुरू झालेली मोहीम पहाटे पावणे दोन वाजेपर्यंत चालली. घटनेची माहिती समजताच उपवनसंरक्षक पंकज गर्ग, वनविभागाचे अधिकारी राजेश पवार यांनी मदतकार्यासाठी मार्गदर्शन केले. घटनास्थळी प्रांत चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, दयानंद कोळी, अतिरीक्त पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधिक्षक फडतळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणदिवे यांनी पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन केले.

रविवारची सुट्टी असल्याने नाशिक हुन 28 जण दुगारवाडी येथे धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला गेले होते. सांयकाळी पावसाचा जोर वाढला मुसळधार पावसाने काही वेळेतच उग्र रूप धारण केले. धबधबा ओलांडून गेलेल्यांपैकी 5 जण कसे बसे आले असताना नदीला सोबतच धबधब्यावर पाण्याचा जोर वाढला त्यामुळे साधारण 21 जण त्या पलिकडच्या बाजूला अडकून राहिले. पावसाचा आणि पुराचा जोर कमी होईल या आशेवर वाट पहात बसल्याचा रात्री धीर खचू लागला त्यात त्या भागात मोबाईल रेंज नसल्याने हा सगळा प्रकार लक्षात यायला उशीर झाला होता. वाहुन गेलेल्या युवकाचे नाव अविनाश गरड असे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!