200 किलोमीटर सायकलिंग नाईट ब्रेवे मध्ये नाशिकच्या 31 सायकलिस्टचा सहभाग

 

नाशिक :- 200 किलोमीटर सायकलिंग नाईट ब्रेवेमध्ये नाशिकच्या 31 सायकलिस्टनी सहभाग घेतला. आज दुपारी 4 वाजता मुंबई नाका येथून 200 किमी नाईट ब्रेवेला सुरुवात झाली.

ही राईड पूर्ण करण्यासाठी 13.5 तासचा निर्धारीत अवधी दिला जातो. सर्व सायकलिस्ट यांनी उद्या सकाळी 5.30 वाजेपर्यंत ही राईड पूर्ण करणे आवश्यक आहे. रात्रीची सायकलिंग असल्याने दिवसाच्या उकाड्यापासून दिलासा मिळणार असल्याने सायकलिस्टमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

या राईड मध्ये नाशिक, पुणे, औरंगाबाद, नगर, संगमनेर, सिन्नर येथील रायडर्स सहभागी झाले. या मध्ये विशेष करून 69 वर्षीय सायकलिस्ट चंद्रकांत नाईक (सुपर रँडोनियर) आणि महिलांमध्ये सायकलिस्ट नीता नारंग (हाफ आयर्नमॅन), विजय घुमरे, अर्चना घुमरे, निलेश झंवर (आयर्नमॅन), गणेश कुवर, डॉ. अनिल कानडे हे सहभागी झाले होते. गणेश कुवर, डॉ. अनिल कानडे हे दोघे तांडेम सायकल (डबल सायकल) चालवत आहेत.

या राईडचे आयोजन नाशिक रँडोनियर क्लबचे डॉ. महेंद्र महाजन यांनी केले, तर मर्शल्लिंग साठी यशवंत मुधोलकर आणि प्रकाश वाघ ड्राइवर यांनी जबाबदारी पार पडली.

असा आहे ब्रेवे राईडचा मार्ग
मुंबई नाका येथून घाटनदेवी मंदिर, इगतपुरीपर्यंत आणि इथून परत वळून नाशिक क्रॉस करून सोग्रस फाटा, चांदवड जवळ आणि इथून परत फिरून द्वारका, नाशिक येथे राईड समाप्त होईल. सेफ्टी साठी सर्व सायकलिस्ट यांना हेल्मेट व रेफलेक्टर जॅकेट परिधान करणे बंधनकारक असून सायकलला पुढे आणि मागे लाईट लावणे बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!