कणकवलीत बस उलटल्याने 4 जण ठार

कणकवलीत आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 4 ठार झाले आहेत.

या अपघातात आरामबस उलटून 4 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजिक हा अपघात झाला.

पहाटे 4 वाजता हा अपघात झाला. गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!