पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

लोणावळा लगतच्या शिलाटने हद्दीत हा अपघात झाला. मुंबईवरून पुण्याला कारमध्ये हे पाच जण भरधाव वेगात येत होते. चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुभाजक ओलांडून गाडी विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली. समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही गाडी आली. काही कळायच्या आता गाडीचा चक्काचूर झाला आणि गाडीतील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे.

दरम्यान, मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करत आहेत, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली आहे.