इगतपुरी (वार्ताहर) :- मुंबईहून दिशेने नाशिककडे जात असताना गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ एम.एच.02 सीएच 7181 या कारने पुढे जाणार्या वाहनाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात नाशिकच्या आडगाव नाका परिसरातील 5 प्रवासी जखमी झाले आहे.

आज सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

जखमींमध्ये चारुशीला सूर्यवंशी जाधव (वय 42), शुभांगी संजय हिरे (वय50), राहुल रामदास सूर्यवंशी (वय 45), वंदना रामदास सूर्यवंशी (वय 70), मयूर संजय हिरे (वय 30, सर्व रा. आडगाव नाका नाशिक) यांचा समावेश आहे.