नाशिक :- 2 दिवसांपूर्वीच सातपुरला बिबट्या जेरबंद केल्यानंतर काल येथील म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.

याबाबत वन विभागाने दिलेली अधिक माहिती अशी, की आडगावला पोलीस मुख्यालयाजवळ आळंदी कालव्याजवळ जाधव देशमुख वस्ती आहे. येथे दीपक त्र्यंबक देशमुख यांची शेती व घर असून त्यांचा मुलगा साई काल सायंकाळी तेथून जात असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला.

बिबट्याला नागरिकांनी पाहिल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या तिथून पळून गेला. जखमी साईवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.