अकोला : चोरीचे सोने घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका सराफावर पोलीस कोठड़ीत अनैसर्गिक अत्याचार सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 6 जणांना निलंबित करण्यात आले आहे. सराफाला जामीन मिळाल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शेगाव येथील सराफा व्यावसायिकाला 9 जानेवारीला रात्री 3 वाजता अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यावेळी पोलीस कोठडीत नितीन चव्हाण आणि शक्ती कांबळे या दोन कर्मचाऱ्यांनी आपल्यावर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप सराफ व्यवसायिकाने केला होता. गाडीतून पोलीस ठाण्यात नेत असतानाही आपल्याला मारहाण करत तोंडावर थुंकल्याचे आरोपात त्याने म्हटले आहे. कोठडीत चौकशीदरम्यान सोने चोरी प्रकरणातील इतर दोन आरोपींना सराफ व्यवसायिकावर लैंगिक अत्याचार करायला लावल्याचाही आरोप सराफाने केला होता.
प्राथमिक चौकशीत सराफ व्यवसायिकावर कारवाईसाठी गेलेले पोलीस टीम दोषी आढळल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस शिपाई शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, मोंटी यादव, काटकर आणि चालक पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे.
सराफ तक्रारित म्हटले आहे, की त्याला त्यानंतर शेगाववरून अकोला याठिकाणी येत असताना, पोलिसांनी संबंधित सराफाला गाडीतच प्रचंड मारहाण केली होती. त्यानंतर रविवारी न्यायालयाने संबंधित सराफाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
या दोन दिवसांच्या कालावधीत पोलीस निरीक्षक चव्हाण आणि पोलीस शिपाई कांबळे यांनी बेदम मारहाण केली. हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांनी संबंधित सराफा व्यापाऱ्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. त्यानंतर पीडित व्यावसियाकाने अकोला पोलीस अधिक्षक आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.