बैलाच्या शिंगात वीज वाहिनी अडकल्याने दोघा भावांसह बैल ठार

वैजापूर (भ्रमर वृत्तसेवा) :- शेतातून बैलगाडीवर घरी येत असताना लोंबकळत असलेल्या वीजेच्या तारा बैलांच्या शिंगांमध्ये अडकल्यामुळे शॉक बसून बैलजोडीसह मालकाचा मृत्यू झाला. पाठोपाठ त्यांना वाचविण्यासाठी आलेला भाऊ देखील या शॉकने मरण पावला. वैजापूर तालुक्यात बायगाव येथे चेळेकर वस्तीत हा प्रकार घडला.

रस्त्यात लटकलेल्या तारा बैलांच्या शिंगात अडकल्या होत्या. त्यामुळे आधी बैलांना शॉक लागला. बैलजोडी जागीच कोसळली. तर बैलगाडीत असलेल्या शेतकर्‍यालाही विजेचा जबर शॉक बसला आणि त्यांचाही मृत्यू झाला. ही घटना पाहत असताना सख्खा भाऊ आपल्या भावाला वाचवण्यासाठी धावला. पण त्यांनाही मृत्यूने कवटाळलं आणि दोघा सख्ख्या भावांचा शॉक लागून जीव गेला. त्यामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातो आहे.

70 वर्षांचे साहेबराव गणपत चेळेकर हे एकत्र कुटुंबात राहत होते. ते संध्याकाळी पाऊस पडून गेल्यानंतर शेतातून घराकडे निघाले होते. बैलगाडी लोखंडी असल्यामुळे विजेचा प्रवाह वेगाने पसरला. सख्खा भाऊ शॉक लागून तडफडतोय हे पाऊन त्यांचा सख्खा भाऊ बाबुराव चेळेकरही मदतीसाठी धावला. इतर गावकर्‍यांनीही आरडाओरडा गेला. पण काही कळायच्या आत बाबुराव यांनाही शॉक बसला आणि ते देखील जागीच कोसळले. अवघ्या काही क्षणात दोघा सख्ख्या भावांचा विजेच्या शॉकने जीव घेतला. ही घटना गावातील लोकांनी पाहिल्यानंतर त्यांचंही काळीज सुन्न झालं. एका शेतकर्‍याने बोअर

खोदण्यासाठी दूरवरून वीजपुरवठा घेतला होता. पावसामुळे काम बंद होते. मात्र याच वीज वाहिनीमुळे ही घटना घडल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!