शिर्डीतील साई मंदिरात भाविकांची गर्दी

शिर्डी (प्रतिनिधी):- शिर्डीतील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे उत्सव साध्या पद्धतीने पार पडला होता. यावर्षी साई बाबा मंदिर भक्तांसाठी खुले असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आलेल्या भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी आज साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे.

देश-विदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई बाबांना भाविक गुरुस्वरुप मानतात. भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं हिच भावना मनात ठेवून लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. नाशिक, पुणे, मुंबई आदी ठिकाणाबरोबरच परराज्यातील अनेक पालख्या साई बाबांच्या नामाचा जयघोष करत शिर्डीत दाखल झाल्या आहेत.

या व्यतिरिक्त अनेक भाविक रात्रभर पायी प्रवास करत शिर्डीत दाखल झाले आहेत. आज सकाळी काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा यांची सवाद्य मिरवणूक गुरुस्थान मार्गे द्वारकामाईत नेण्यात आली. आजच्या दिवशी गुरुला भगवंत मानून गुरुंनी आपल्यावर केलेल्या उपकरातून उतराई होण्याचा आजचा दिवस आहे. साई बाबांनी दिलेला सर्वधर्म समभावाचा संदेश जगभरात नेण्याचा संकल्प यावेळी अनेक भक्तांनी केल्याचं सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!