येवल्यात डिलीव्हरी बॉयला मारहाण करून 14 हजारांचा ऐवज लुटला

येवला (वार्ताहर):- शहरात एका खासगी कंपनीच्या फुड डिलिव्हरीचे काम करणार्‍या मनोज वीरचंद शिंगी (वय 38, रा. पारेगाव रोड येवला) या तरुणाला दोन अज्ञात चोरट्यांनी रस्त्यात अडवून लूट करून त्याला बेदम मारहाण केली आहे.

यावेळी झालेल्या मारहाणीत मध्ये लुट झालेल्या तरुणाला 11 टाके पडले असल्याची माहिती मिळाली आहे. चोरट्यांनी 8 हजार 200 रुपये रोकडसह 14 हजार 200 रुपयांचा ऐवंज
लुटला.

मनोज शिंगी हे रात्री दहा वाजता फूड कंपनीची ऑर्डर घेऊन कांदा मार्केट समोरील पाटोदा रस्त्यावर जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला गाडी थांबून ते आपल्या नातेवाईकांशी फोनवर बोलत असताना तेथे आलेल्या दोघा इसमांनी मनोज शिंगी या फूड डिलिव्हरी बॉयला मारहाण केली. त्याच्या ताब्यातील 6 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि 8 हजार 200 रुपये रोख असे एकूण 14 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला.

यावेळी मनोज शिंगी यांनी त्यांना प्रतिकार केला असता त्यांच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर चोरटे पसार झाले. मनोज शिंगी यांच्या तक्रारीनुसार अज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे हे करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!