अवघ्या चौदा वर्षाच्या मुलीने सात वर्षीय चिमुकलीचा गळा चिरून केली हत्या

जालना : येथे धक्कादायक घटना घडली आहे. आठवडाभर शाळेमध्ये गैरहजर असलेल्या 14 वर्षीय मुलीला पालकांनी शाळेमध्ये जाण्याचा तगादा लावल्याने संतापाच्या भरात तिने आपल्या 5 वर्षीय चुलत बहिणीचा गळा चिरून हत्या केली. चुलत बहिणीला बाथरूममध्ये कोंडून ब्लेडने त्याच्या गळ्यावर वार करून निर्घृणपणे हत्या केली आहे. जालना शहरातील चौधरी नगर भागामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने जालना शहर हादरला असूनम परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून, तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ईश्वरी रमेश भोसले (वय 7 वर्षे) असे मयत चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना 112 वर फोन आला होता की, जालना शहरामधील चौधरी नगर भागामध्ये एका घरातील बाथरूममध्ये मुलीचा गळा कापल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तोपर्यंत जखमी मुलीला संतकृपा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ रुग्णालयामध्ये धाव घेतली. यावेळी ईश्वरीच्या हाताला आणि गळ्यावर जखमा असल्याचे पाहायला मिळाले. तसेच तिच्या चेहऱ्यावर देखील वार करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयामध्ये जाताच ईश्वरीचा मृत्यू झालेला होता.

आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास ईश्वरी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. यावेळी तिच्या मागोमाग आलेल्या चुलत बहिणीने बाथरूमचा आतून दरवाजा लावून घेतला. त्यानंतर ईश्वरीच्या गळ्यावर आणि हातावर तिने वार केले, यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपी मुलीने ही हत्या का केली याबाबत अद्याप कोणतेही ठोस माहिती समोर आलेली नाही.

अधिक माहितीनुसार, ईश्वरी भोसले (वय 7 वर्षे) ही मुलगी युकेजीच्या वर्गामध्ये खरपुडी रोडवरील एका इंग्लिश शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. ईश्वरीचे आई-वडील शेतकरी असून त्यांनी तिला शिक्षणासाठी जालना येथे चौधरीनगर येथे राहणाऱ्या काका गणेश भोसले यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवले होते. त्यामुळे ती आपल्या चुलत्याकडेच राहत होती. ईश्वरीच्या काकाची रक्तलघवी तपासणी लॅब घनसावंगी तालुक्यात असल्याने दररोज ते जालना येथून येणे-जाणे करतात. आज सोमवारी सकाळी ईश्वरी शाळेमध्ये जाणार होती. 8 वाजेच्या सुमारास ईश्वरी अंघोळीसाठी जाताच अल्पवयीन आरोपी मुलगी देखील बाथरूममध्ये तिच्या पाठोपाठ आतमध्ये घुसली. तिने आधी दरवाजा आतमधून बंद करून घेतला. त्यानंतर तिने ब्लेडने ईश्वरीच्या गळ्यावर, हातावर, मानेवर वार केले. ईश्वरीच्या किंचाळण्याच्या आवाजाने काकू आणि अन्य लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी मुलीने आधी बाथरूममधील रक्त धुवून काढले आणि त्यानंतरच दार उघडले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!