निफाड (वार्ताहर) : कसबे सुकेणेे-वडाळी नजीक दरम्यानच्या शिवारात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणार्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या बिबट्याने परिसरात धुमाकूळ घातला होता. परिसरातील शेतकर्यांच्या मागणीनुसार वनविभागाने २१ जानेवारी रोजी कसबे सुकेणे शिवारातील बबलू परसराम खोडे यांच्या शेतात पिंजरा लावला होता.

आज (दि. २३) पहाटेच्या सुमारास हा बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनविभागाने पिंजरा ताब्यात घेतला असून बिबट्याला निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत आणण्यात आले असून, त्याची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.