नाशिक प्रतिनिधी: दुकानाचे शटर उघडून दुकानातील पेपर कप बनविण्याचे मशीन अज्ञात इसमाने जाळून नुकसान केल्याची घटना बेलतगव्हाण येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रवी हिरामण पाळदे (वय 31, रा. पाळदे मळा, बेलतगव्हाण, नाशिकरोड) यांचे बेलतगव्हाण येथे रुद्रा एंटरप्रायजेस नावाचे पेपर कप बनविण्याचे शॉप आहे.
या शॉपचे शटर दि. 27 ते 29 मार्चदरम्यान अज्ञात इसमाने उघडून दुकानात प्रवेश केला व दुकानात असलेले पेपर कप बनविण्याचे मशीन कशाच्या तरी सहाय्याने जाळून नुकसान केले.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.