इंदापूरमध्ये शिकाऊ विमान कोसळले

इंदापूर (भ्रमर वृत्तसेवा):- पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकावू विमान कोसळल्याची घटना घडली आहे. शिकाऊ विमान एका शेतात कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात पायलट मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात तालुक्यात कडबनवाडी इथं ही घटना घडली आहे. आज सकाळी कडबनवाडी इथं हे विमान दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात कोसळले. या अपघातात पायलट तरुणी किरकोळ जखमी झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. बारामती येथील हे शिकाऊ विमान घेऊन तरुणी सराव करत होती. पण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात एका शेतात कोसळले.

आज सकाळी 11:20 ते 11:30 वाजेदरम्यान कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी गावाच्या हद्दीत कोसळले. यामध्ये शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड (वय 22 वर्ष रा. पुणे) या किरकोळ जखमी झाल्या. त्यांना औषध उपचार करून शेळगाव येथील नवजीवन हॉस्पिटल शेळगावमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!