मखमलाबादरोडवर तरूणाची दगडाने ठेचून हत्या?

नाशिक (प्रतिनिधी) : पंचवटीतील मखमलाबाद रोडवर एका तरूणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समजते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मखमलाबाद रोडवरील पंचवटीतील समर्थ नगरच्या समोर हमालवाडी पाटा लगत एक 30 ते 35 वर्षीय तरूणाचा चेहरा दगडाने ठेचला गेल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाले आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांना ओळख पटविण्यासाठी बोलावले असता कोणालाही तो ओळखीचा वाटला नाही.

घटना स्थळी सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पथकाने तपासाच्या दिशेने शोध कार्य सुरु केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!