नाशिकरोड (प्रतिनिधी):– भ्रष्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने आत्ता सर्व सरकार मधील भ्रष्टाचार बाहेर येत असल्याने “अब तेरा क्या होगा, कालिया” असा सिनेमा मधील डायलॉग मारत किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार मधील मंत्र्यांना इशारा दिला.

महाराष्ट्रातील आघाडी सरकार भ्रष्टाचारी आहे. त्यांचा भ्रष्टाचार चव्हाटयावर आणणारच, त्यांनी मला मारण्यासाठी कितीही गुंडे पाठवली तरी मी घाबरणार नाही, कारण माझ्यामागे महाराष्ट्रातील जनता आहे. ती मला अश्या भ्रष्ट प्रवृत्तीपासून नक्की वाचवेल . कारण मारने वालेसे जादा ताकदवर बचाने वाला होता है असे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठणकावून सांगितले.

नाशिकरोड भाजप व्यापारी संघटनेचा मेळावा आज कदम लॉन्स येथे पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन किरीट सोमय्या बोलत होते. व्यासपीठावर आ. राहूल ढिकले, भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे , माजी महापौर सतीष कुलकर्णी, माजी आमदार बाळासाहेब सानप , लक्ष्मण सावजी, शहर सरचिटणीस सुनिल आडके, माजी नगरसेवक शरद मोरे, अशोक सातभाई, आयोजक मंगेश पगार आदी होते.
माजी खासदार सोमय्या पुढे म्हणाले की , आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे , अजितदादा पवार हे खिलीडीओ के खिलाडी आहेत . भ्रष्टाचार कसा लपवायचा हे त्यांच्याकडून शिकण्याची आवशकता आहे. पण काहीही झाले तर आता आम्ही आघाडी सरकारमधील घोटाळेबाजांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहोत . सचिन वाजे हे आता माफीचे साक्षीदार झाले आहेत.
त्यांची नियुक्ती ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केली , प्रदीप शर्मा आणि सचिन वाजे यांनी तोंडे उघडली तर मुख्यमंत्री ठाकरे अडचणीत सापडतील , त्याचप्रमाणे सचिन वाजे यांनी मनसुख हिरेण यांची हत्या प्रदीप शर्मा यांनी केली अशी माहीती पोलिसांना दिली आहेत . मनसुख हिरेन यांच्या पत्नी व मुलांनी मनसुख हिरेण यांच्या हत्याची चौकशी करावी अशी मागणी केली तर मुख्यमंत्री ठाकरे यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागेल,अशी शक्यता सोमय्या यांनी वर्तवली. त्याचप्रमणे परिवहन मंत्री अनिल परब यांचे अलिबाग येथील रिसोर्ट बांधकामाला लागणार खर्च कसा केला हे अदयाप स्पष्ट केले नाही .
तीही चौकशी त्यांच्या अंगलट येऊ शकते. मंत्री नवाब मलीक खुपच बडबड करीत होते . त्यांना असे वाटत होते की, आपल्या मागे दाऊद आहे. आपले कुणी काहीही करु शकत नाही , पण आज त्यांची अवस्था कशी आहे ,हे आपण पाहु शकता असे सांगुन सोमय्या यांनी घोटाळेबाज आघडी सरकारचा आपण भ्रष्टाचार चव्हाटयावर आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही , असा पुनरुच्चार सोमय्या यांनी केला.
याप्रसंगी माजी नगरसेवक भय्या मणियार, अण्णा अढाव , मंदा फड , गणेश सातभाई आदी उपस्थित होते .