नाशिक प्रतिनिधी: उसनवार घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून एका इसमाचे चार जणांनी संगनमत करून अपहरण करीत त्याला जबरदस्तीने रिक्षात बसवून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांनी उसनवार पैसे घेतले होते. ते पैसे परत केले नाहीत या रागातून चार जणांनी संगनमत करून पीडित इसमाला रिक्षामध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण करीत त्याला मारहाण, शिवीगाळ करीत धमकी दिली, तसेच पीडित इसम हा द्वारका येथून मोटारसायकलीवरून जात असताना या चार संशयितांनी त्याचा पाठलाग करून मोटारसायकल थांबविली व धमकी देऊन शस्त्राने दुखापत केली.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.