इगतपुरी (भास्कर सोनवणे) :- मुंबई आग्रा महामार्गावरील टाके घोटी जवळ पीकअप आणि कारचा भीषण अपघात झाला आहे.

ह्यामध्ये पीकअप वाहन उलटले असून ह्या वाहनाला आग लागल्याचे समजते. अपघातात २ जण जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
धनाजी अनंता पाटील (वय 35, रा. गोईकणे चाळ, घोटी), हिंमतराव शेषराव कैंदळे (वय 45 रा. नाशिक) अशी जखमींची नावे आहेत. महामार्ग पोलिस, रुट पेट्रोलिंग टीमने प्रसंगावधान आगग्रस्त वाहनाची आग विझवली. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.