एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून करून फरारी झालेला लासलगाव पोलिसांच्या ताब्यात

लासलगाव :- काल दुपारी औरंगाबाद येथे एकतर्फी प्रेमातून हत्या केलेल्या आणि फरार झाले शरण सिंग सविंदर सिंग शेटी (वय 20) या संशयितास लासलगाव येथील गणेश नगर भागातून त्याच्या बहिणीच्या घरातून पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे व लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने गुप्तता पाळत लासलगाव पोलिसांनी आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही तासातच केल्याने या आरोपी औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी, की वेदांत नगर पोलिस कार्यालयात काल सुखप्रीत कौर उर्फ कशिश प्रतिपाल ग्रंथी या कॉलेज युवतीचा एकतर्फी प्रेमातून शस्त्राने वार करून शरण सिंग सविंदर सिंग शेटी याने वार करून खून केला होता. याबाबत औरंगाबाद पोलीस आयुक्तलायातील वेदांत. नगर. पोलीस ठाण्यात फिर्याद काल दाखल झाली होती. या खुनानंतर शरण सिंग सविंदर सिंग शेटी हा फरारी झाला होता. या फरारी संशयिताचा शोध पोलिस यंत्रणा तातडीने करत होती. याबाबत पोलीस आयुक्तलयातील वेदांतनगर पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी नाशिकचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना
यांना सदर संशयित आरोपी लासलगाव येथील त्याचे बहिणीकडे आला असल्याची माहिती दिली होती.

त्यानुसार खबर मिळताच गुप्तता पाळत तातडीने पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे व लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ ,पोलीस अंमलदार योगेश शिंदे, हवालदार संदीप शिंदे विजय बारगल यांच्या पथकाने आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास लासलगाव येथील श्री गणेश नगर मधील गणेश मंदिरामागे त्याच्या बहिणीच्या घरात छापा टाकून फरारी झालेल्या शरण सिंग सविंदर सिंग शेटीयास ताब्यात घेतले. तातडीने ही घटना औरंगाबाद पोलिसांना कळविताच औरंगाबाद पोलिसांचे पथक दाखल झाले आणि आणि आरोपीस ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!