नाशिकरोड (प्रतिनिधी):- बलात्कार प्रकरणी मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीचा हृदय विकाराच्या झटक्याने कारागृह रुग्णालयात मृत्यू झाला.

गोपी हरिसिंग बोरा (वय 50, रा. सुर्वे चाळ, रूम नंबर 1134, लोकमान्य नगर, पाडा क्रमांक चार, ठाणे पश्चिम, सध्या मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड) हे मयत झालेल्या बंदी चे नाव आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये गोपी बोरा याच्यावर भादंवि कलम 376 /2/1 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात गोपी बोरा यास 10 जानेवारी 2016 रोजी अटक करण्यात आली होती. साक्षी व पुरावे पाहता ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने 12 एप्रिल 2019 रोजी या गुन्ह्यात दोषी मानत 14 वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दंड ठोठावला होता.
ही शिक्षा भोगत असताना त्याला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. त्याच्यावर हृदयावर मुंबई येथील सरकारी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली होती. काल सकाळी त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याच कारागृह रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.