मुंबई : 3 दशकांपासून चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

त्यांची कार एका ट्रकला धडकली असून सुदैवाने कारमध्ये प्रवास करणाऱ्या कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातात गाडीचे मात्र मोठ नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती किशोरी शहाणे यांनी स्वतः इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे.

त्यांनी इंस्टाग्रामवर अपघातग्रस्त कारचे तीन फोटो पोस्ट केले आणि लिहिले आहे की, कारचे नुकसान झाले मात्र जीव वाचला. देवाची कृपा. ‘देव तारी त्याला कोण मारी’. अशा आशयाचे कॅप्शन किशोरी शहाणे यांनी पोस्ट टाकले आहे. किशोरी यांच्या पोस्टवर कमेंट करत, सीरियलमध्ये शिवानीची भूमिका साकारणाऱ्या यामिनी मल्होत्राने चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली आहे.
https://www.instagram.com/p/CZlxSo3L25N/?utm_medium=copy_link