कोलकाता : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर आरोप करून प्रकाशझोतात आलेली बंगाली मनोरंजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता बाबत एक बातमी समोर येत आहे.

कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यादरम्यान पाकिटमारी केल्याच्या आरोपात रुपा दत्ताला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे बंगाली मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यामध्ये काही पोलीस ड्युटीवर तैनात होते. त्यावेळी त्यांनी एका महिलेला डस्टबिनमध्ये एक बॅग फेकताना पाहिले. पोलिसांना तिचे वागणे संशयास्पद वाटल्याने त्यांनी तिथे तिची चौकशी केली, पण तिने नीट उत्तरे दिली नाहीत. पोलिसांनी जेव्हा तिच्या बॅगेची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये 75000 रुपये आढळून आले. पोलिसांनी हे पैसे जप्त केले आहेत.
या महिलेला बिधाननगर नॉर्थ पोलीस ठाण्यात आणण्यात आले, तेव्हा चौकशीअंती हे लक्षात आले की ही महिला प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता आहे. तिने हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणात पोलीस अधिक चौकशी करत आहेत.