रिक्षाने मजुरीसाठी जात असताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जणांचा मृत्‍यू

नांदेड : अपघाताच्या घटना थांबता थांबत नाहीये आज सकाळी नांदेड ते मुदखेड मार्गावरील इजळी पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

रोजच्‍या नित्‍यनियमाप्रमाणे नांदेडला रिक्षाने अनेकजण मजुरीसाठी जात होते. यानुसार आज देखील ॲपेरिक्षामध्ये जवळपास १५ प्रवाशी होते. हे सर्व जण वाजेगाव येथे मजुरीसाठी जात होते. परंतु, कामावर पोहचण्यापुर्वीच रिक्षाला अपघात होवून काळाने घाला घातला.

नांदेड ते मुदखेड या मार्गावरन सिमेंटने भरलेल्या ट्रकने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली असून या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एका लहान मुलाचा आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. नांदेड ते मुदखेड या मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. यात नांदेडकडे प्रवाशांनी भरलेली ॲपरिक्षा जात होती.

या वेळी नांदेड कडून भरधाव येणाऱ्या सिमेंटने भरलेल्‍या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा दूरवर फेकली गेली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्‍यू झाला. तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्‍य ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!