मुंबई :- संजय राऊत यांना काल रात्री ईडीने अटक केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांची अटक हे कटकारस्थान आहेे. बंडखोरी झालेल्या 40 जागांवर निवडणुका घ्या, सत्ता जिंकते की सत्य जिंकते कळू द्या, असे आव्हानच आदित्य ठाकरेंनी दिले आहे.

ते पुढे म्हणाले की, दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ आहे. कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कळत नाही. शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे. ठाकरे परिवार कधीही संपणार नाही. समोर असलेले हे ठाकरे परिवार आहे. कोकणाचा आवाज म्हणजे शिवसेनेचा आवाज आहे. बंडखोरांनो राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे म्हणत त्या 40 लोकांसाठी मातोश्रीचे दरवाजे अजूनही उघडी आहेत, असेही ते म्हणाले.

राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेनेतर्फे राज्यभर निदर्शने करण्यात येत आहेत. महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु आहे, असा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे.