अखेर आफताबने सांगितले हत्येचे खरे कारण

नवी दिल्ली : श्रद्धा हत्याप्रकरणी आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्यात आली होती. या दरम्यान आफताबला महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते. एफएसएलचे सहायक संचालक संजीव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने नार्को टेस्टमध्येही श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. इतकेच नव्हे तर आफताबने नार्को टेस्टमध्ये श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे कुठे फेकले याचबरोबर श्रद्धाचा खून का केला याबाबतही माहिती आफताब पूनावाला याने दिली आहे.

आफताबने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, आफताबचे श्रद्धासोबत ब्रेकअप झाले होते. ते नात्यात नव्हते. दोघेही रूम पार्टनर म्हणून सोबत राहत होते. त्यानंतर आफताबने आता आणखी एक खुलासा केला आहे, की 17 मे रोजी श्रद्धा ‘बंबल’ या डेटिंग अ‍ॅपवरून ओळख झालेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती. ती 18 मे रोजी दुपारी त्यांच्या मेहरौली येथील फ्लॅटवर परत आली तेव्हा या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. आफताबला याचा तिचा प्रचंड राग आला आणि त्याने रागाच्या भरात श्रद्धाचा खून केला.

आफताबने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी ‘बंबल’ या ॲपला पत्र लिहून श्रद्धाच्या अकाउंटची सर्व माहिती मागवली आहे. परंतु मिळालेले उत्तर अद्याप उघड केले नाही. नार्को-अ‍ॅनालिसिस टेस्टमध्ये आफताबने सांगितले की, बद्री नावाच्या मित्राच्या घरी गेल्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे तुकडे मेहरौलीच्या जंगलात टाकण्याचा विचार सुचला असे देखील त्याने पोलिसांना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!