राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीनंतर म्हणाले की, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ही रेट वाढला आहे. त्यामुळे कोरोना टेस्ट वाढवण्याच्या सूचना अतिशय कडक पद्धतीने देण्यात आल्या आहेत.

रविवार असल्याने काल कोरोना टेस्ट काही प्रमाणात कमी झाल्या. मात्र आजपासून कोरोना चाचणी वाढवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मास्कसक्ती कुठेच नाहीये. मात्र मास्क वापराबाबत आवाहन करण्यात आले आहे असे टोपेंनी सांगितले.