नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा):- सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसकडून अपडेट देण्यात आली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. 12 जून रोजी सोनिया गांधी यांच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरु झाला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनिया गांधी सध्या रुग्णालयातच उपचार घेत आहेत. गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक सोनिया गांधी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी सोशल मीडियाद्वारे सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती.
12 जून रोजी त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरु झाला. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोनिया गांधी यांना फंगल इन्फेक्शन झालेय, त्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. कोरोनानंतर होणार्या आजाराचा आणि फंगल इन्फेक्शनचा उपचार सुरु आहेत. दरम्यान, सोनिया गांधी यांना दोन जून रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती.