मुंबई ( भ्रमर वृत्तसेवा):-सतत दौर्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थकले आहे. त्यामुळे शिंदेंनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून नवी दिल्लीला रवाना झाले आहे.

आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि शिंदे गटावर सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणी हे 8 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत असलेल्या शिंदे सरकारचा सर्व कार्यक्रम खोळंबला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व कार्यक्रमांना स्थगिती दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.