’झुंड’ चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी घेतले कमी मानधन; म्हणाले…

मुंबई :- स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित झुंड चित्रपटामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबतच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. शुक्रवार दि. 4 मार्च रोजी सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अमिताभ बच्चन हे या चित्रपटात फुटबॉल कोच ही भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी या चित्रपटासाठी अमिताभ यांनी घेतलेल्या मानधनाबाबत सांगितले.

ते म्हणाले की, 2018 मध्ये नागराज मंजुळे यांनी पुण्यात या चित्रपटाचा सेट उभारला. पण पैसे कमी असल्याने हा सेट हटवण्यात आला. टी सीरिजच्या सहाय्याने आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली, आम्ही पूर्ण चित्रपटाचे शूटिंग हे नागपूर येथे केले. मी यासाठी भूषण कुमार यांचे आभार मानतो.

’बच्चन सरांना या चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली. कमी बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मीती कशी करायची असा आम्ही विचार करत होतो. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांचे मानधन कमी केले. ते म्हणाले होते की, माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा चित्रपटावर पैसे खर्च करूयात. तसेच अमिताभ बच्चन यांच्या स्टाफने देखील त्यांचे मानधन कमी केले.’

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!