अमृता फडणवीसांनी ‘मंगळसूत्रा’बाबत केला ‘हा’ खुलासा

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली.

या भागात अमृता फडणवीस एका खास गोष्टीचा खुलासा करताना दिसणार आहे. प्रेक्षक महिला आलेल्या सेलिब्रेटी पाहुणीला भन्नाट प्रश्‍न विचारून भंडावून सोडत असतात. अमृता यांना सुद्धा एक महिला गळ्यात मंगळसूत्र घातले नाही तर सासूबाई बोलतात का असा प्रश्‍न विचारताना दिसत आहेत.
त्यावर अमृता उत्तर देत बोलतात, ’मंगळसूत्र म्हणजे नवरा अर्थात सौभाग्याचं निशाण असतं. पण मला असं वाटतं की आपल्या पतीनं आपला गळा पकडण्यापेक्षा हातात हात दिलेला कधीही चांगला, म्हणून मी कायम हातात मंगळसूत्र घालते, म्हणजे मला नेहमी वाटत की देवेंद्र माझ्यासोबत आहेत आणि आम्ही एकमेकांचा हात धरून ठेवला आहे. जसा अनेकांचा गळा पकडला असतो तर गळ्याला फास बसण्यापेक्षा हातात हात कधीही छान.’

याशिवाय एका प्रोमोमध्ये देवेंद्र आणि अमृता यांच्यातला एक खट्याळ संवाद सुद्धा बघायला मिळणार आहे. देवेंद्र यांच्या फोटोशी संवाद साधताना त्या म्हणतात, ’अरे वा! आज वेळ मिळाला वाटतं. कुठे नेताय फिरायला? आसाम ला?’ मागच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमध्ये आसाम, गुवाहाटी, सुरत अशी अनेक शहरं जोडली गेली होती. त्याचा संदर्भ लावत अमृता जबरदस्त उत्तर देताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!