सध्या सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधला एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेनच्या आत एक घोडा दिसत आहे.

लोकल ट्रेनमध्ये एक व्यक्ती चक्क घोड्यासोबत प्रवास करताना पाहायला मिळते आहे. ही व्यक्ती घोडा घेऊन ट्रेनमध्ये चढली. त्यावेळी कुणीतरी काढलेला व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्हायरल झालेल्या फोटोवरून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. घोड्याचे फोटो आणि व्हिडीओ मिळाल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एकलव्य चक्रवर्ती यांनी सांगितले आहे.

लोकल ट्रेनमधील घोड्याचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ पश्चिम बंगाल येथील आहे. जिथे सियालदह-डायमंड हार्बर डाउन लोकल ट्रेनमध्ये एक माणूस घोड्यासह ट्रेनमध्ये चढला. मिळालेल्या माहितीनुसार, या घोड्याने पश्चिम बंगालमधील बरईपूर येथे झालेल्या शर्यतीत या घोड्याने भाग घेतला होता. त्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी घोड्यासह लोकल प्रवास केला. यावेळी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनीही याला विरोध केला, मात्र त्या व्यक्तीने मनमानी करत घोडा आपल्यासोबत ट्रेनमध्ये नेला. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असून लोकांना पाय ठेवण्यासाठी योग्य जागा नव्हती. या घटनेची चौकशी सुरू आहे.
https://twitter.com/vijayrampatrika/status/1512352313650069505?t=C0p8lSo0WbDUBWRH80dG_A&s=19