ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

 

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू 46 वर्षीय अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू झाला आहे. सायमंड्सचा मृत्यू हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांसाठी या वर्षातील तिसरा धक्का आहे. यापूर्वी शेन वॉर्न व रॉड मार्श या दोघांचाही आकस्मिक मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार क्विन्सलॅण्डमधील अॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडच्या गाडीचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊन उलटल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सायमंड्सच्या मृत्यूनंतर अनेक दिग्गजांनी ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली अर्पण केली. ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू जॉनस निल गिलेस्पीने सायमंड्सच्या मृत्यूसंदर्भात धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला “धक्कादायक बातमी आहे. आम्ही सर्वचजण तुला कायमच मीस करु मित्रा,”. अॅडम गिलक्रीस्टने, “हे खरोखर वेदनादायी आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

अपघाताची माहिती मिळताच वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले पण त्यांना सायमंड्सला वाचवण्यात यश आले नाही. सायमंड्सने ऑस्ट्रेलियाकडून २६ कसोटी सामने खेळले आहेत. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व असणाऱ्या कालावधीत म्हणजेच १९९७ ते २००७ दरम्यान सायमंड्स हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग होता. त्यानंतर तो फॉक्स क्रिकेटसाठी समालोचक म्हणून काम करत होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!