नाशिक (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 96.94 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. 3.06 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण देखील झालेत. त्यामुळेच मंडळाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या तारखांचीही घोषणा केली आहे.

12 वीची पुरवणी परीक्षा 21 जुलै 2022 रोजी, तर 10 वीची पुरवणी परीक्षा 27 जुलै 2022 रोजी होणार आहे. मंडळाने दहावी निकालाची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच ही माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 12 वीची पुरवणी परीक्षा 21 जुलैपासून सुरू होणार आहे.
ही परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होईल. 10 वीची पुरवणी परीक्षा 27 जुलैला सुरू होईल. ही परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान घेण्यात येईल.