मालेगाव (प्रतिनिधी):-मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. ज्या साक्षीदाराच्या जबानीमुळे एटीएसने अभिनव भारत ट्रस्टविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं, तो साक्षीदार कोर्टात सुनावणीवेळी मात्र आपल्या जबाबापासून पलटला. उलट त्याने एटीएसवरच गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 19 साक्षीदारांनी आपला जबाब बदलला आहे. त्यामुळे एटीएसच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसने अभिनव भारत ट्रस्ट विरोधात चार्जशीट दाखल केलं होतं. हा ट्रस्ट लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
स्फोटाशी या ट्रस्टचा संबंध असल्याबाबत एका साक्षीदाराने जबाब दिला होता. कोर्टात याप्रकरणी झालेल्या सुनावणीत हा साक्षीदार आपल्या जबाबापासून पलटला.