20 हजारांची लाच स्वीकारताना चिंचवेच्या सरपंचास अटक

नाशिक (प्रतिनिधी) :- देवळा तालुक्यात चिंचवे (नि.) येथील शिवस्मारक उद्यान चौक सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात 20 हजारांची लाच स्वीकारणार्‍या सरपंचास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले आहे. रवींद्र शंकर पवार आणि त्याचा सहकारी किशोर माणिक पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत तक्रारदाराने तक्रार दिली असता सापळा रचून चिंचवे (नि.) येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर लाच घेताना या दोघांना ्रअटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

सरपंचाने प्रथम 22 हजार रुपयांची लाच मागितली होती. शेवटी 20 हजारांवर तडजोड होऊन ते सापळ्यात अडकले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!