वडिलांच्या विरहाने हृदयावर दगड ठेऊन अनुरागने दिला इयत्ता 10वी चा पेपर आणि …

अनुरागला पेढा भरवताना त्याची आई ज्योती कराड आणि नातेवाईक

मनमाड (सौ.नैवेद्या कत्ते-बिदरी) :- माध्यमिक विद्यालयाचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यातच मनमाड शहरातील माधव नगर येथे राहणाऱ्या आणि छत्रे विद्यालयात शिकणाऱ्या अनुराग कराड या विद्यार्थ्यांच्या निकालाकडे कुटुंबीयांसह नातेवाईक आणि शालेय प्रशासनाचे लक्ष लागून होते.

मात्र या विद्यार्थ्याने शिक्षणाची जिद्द ठेवून प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास केला आणि अखेर त्याच्या मेहनतीला यश देखील मिळाले.आज निकाल लागल्यानंतर अनुरागची अवस्था सुखद अनुभव, आनंद आणि दुःख असा होता. अनुरागला दहावीच्या परिक्षेत ५६ टक्के गुण मिळाले .

किरण सूर्यभान काकड यांनी आपला मुलगा अनुराग किरण कराड याला छत्रे विद्यालय केंद्र असलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेला सोडवले. त्याच दिवशी किरण काकड यांचा अपघात झाला. त्यांना तातडीने नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचा अंतविधी ज्या दिवशी त्याच दिवशी किरण याचा हिंदी विषयाचा पेपर होता किरण परीक्षेला गेला नाही. तर त्याचे वर्ष वाया जाईल असा विचार करून वडिलांच्या अंतविधीच्या दिवशी किरणने न डगमगता हिंदीचा पेपर दिला पेपर देऊन आल्यावर वडिलांचा अंतविधी करण्यात आला.

आज लागलेल्या दहावीच्या निकालात किरण उत्तीर्ण झाला असून त्यास ५६ टक्के गुण मिळाले आहे. त्याप्रसंगी वेळोवेळी घरचे नातेवाईक आणि शिक्षक वृंद यांनी दिलेल्या आज आधारामुळेच आज अनुराग यशस्वी झाल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!