अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मोठा दिलासा

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे. आर्यन खान गेल्या काही महिन्यांपूर्वी कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अडचणीत आला होता. त्यानंतर अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमध्ये आर्यन खानकडे प्राथमिक तपासात ड्रग्ज सापडले नसल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात एनसीबीने असं म्हटलं होतं की अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले होते. हे ड्रग्ज तो आर्यन खानसाठी घेऊन आला होता. त्याचबरोबर एनसीबीचा दावा असा होता की आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून हे ड्रग्ज आले होते आणि आर्यन खान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग आहे.

एनसीबीच्याच विशेष चौकशी समितीच्या तपासानंतर हे उघड झालं आहे की आर्यन खानकडे कोणतंही ड्रग नव्हतं आणि त्याचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नव्हता. तसंच अरबाज मर्चंटकडे सापडलेले ड्रग्ज हे व्यावसायिक वापराच्या प्रमाणापेक्षा कमी होते, तसेच ते आर्यन खानसाठीच होते हेही तपासात कुठेही सिद्ध झालं नाही. या अहवालामुळे त्याला क्लीनचिट मिळण्याची शक्यताही वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!