‘नोकरी ते जॅगरी’ अशोक मंडलिक यांची वंडर जर्नी

 

नाशिक (प्रतिनिधी):- सध्या स्टार्टअप आणि तरुणाईचे दिवस आहेत. शार्क टँक सारख्या कार्यक्रमातून, तरुण उद्योजक व त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांनी व्यापार व उद्योग जगात अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे; परंतु या तरुणाईला लाजवत, नाशिक मधील अशोक मंडलिक या 55 वर्षीय नवउद्योजकाने स्टार्टअपचे ’शिवधनुष्य’ लीलया पेलले आहे.

बॉशसारख्या नामांकित कंपनीत नोकरी, तेथील कामगार सोसायटीचे चेअरमन, कोणाच्याही अडीअडचणीला अर्ध्या रात्री धावून येणारे कामगार नेतृत्व असलेल्या, अशोकरावांचे जीवन अत्यंत स्थिर सुरू होते. काही तरी नवीन करण्याची वा शोधण्याची कुठलीही गरज नव्हती; परंतु स्थैर्याने भरलेल्या, रुटीन झालेल्या जगण्यातला, सगळा कम्फर्ट झोन या उमद्या व्यक्तिमत्त्वाने स्वतःहून सोडला.

55 व्या वर्षी जिथे सर्वसाधारण व्यक्ती रिटायरमेंट नंतरचे प्लॅनिंग करण्यात मश्गुल होते, तेथे मंडलिक यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन, नाशिकमध्ये जॅगवंडर या नैसर्गिक गूळ बनवण्यात, सर्वोत्तम असणार्‍या कंपनीशी करार केला व फ्रँचाईजी घेऊन स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. काम सुरू करण्याआधी तब्बल दोन वर्षे गूळ निर्मिती, प्रक्रिया व वितरण याचा तपशीलवार अभ्यास केला. त्यानंतरच जॅगवंडर गुळाची निवड केली. साखरेला सर्वोत्तम पर्याय असणारा, तसेच उकळत्या चहात टाकला तरी चहा न फाटणारा, अशी गॅरंटी देणारा, दर्जेदार जॅगवंडर गूळ त्यांनी उद्योग म्हणून निवडला. महाराष्ट्र व कर्नाटक येथे गूळनिर्मितीचे तीन मोठे प्लांट असलेला व भारतभरात 212 पेक्षा जास्त फ्रँचाईजी असलेल्या जॅगवंडरचे सीईओ व महाराष्ट्राचे जॅगरी आयकॉन बंडू पवार यांची त्यांना मोलाची साथ लाभली. कोरोनाच्या वैश्‍विक संकटात अनेक युवकांची नोकरी गेली, उद्योगधंदे मंदावले, परंतु यातील अनेक उत्साही निर्मितीक्षम युवकांना मंडलिक यांनी जॅगवंडर व्यवसायात उतरविले आहे. उद्योजक होण्याकरिता लागणारा सेल्स, मार्केटिंग व सोशल मीडिया असा सगळा ’सपोर्ट’ युवकांना ते अत्यंत उत्साहाने देत असतात. कोणताही व्यवसाय-उद्योग सुरू करण्याकरिता वयाचे बंधन नसते, हवी असते ती दुर्दम्य इच्छाशक्ती. हे मंडलिक यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.

चाकोरीबद्ध जगण्याच्या पलीकडे विस्तीर्ण आकाश सदैव वाट पाहत असते, गरज असते ती आपल्या मनाची कवाडे उघडण्याची. ‘नोकरी ते जॅगरी’ अशी वंडर जर्नी करणार्‍या अशोकरावांना सलाम. आपणही उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असेल, तर अशोक मंडलिक यांना 9822146862, 8329007594 येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!