पुणे : राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आ. उदय सामंत यांच्या गाडीवर आज हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सुदैवाने उदय सामंतांना दुखापत झालेली नाही. मात्र त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत.

कात्रज चौकामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामंत शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराच्या दिशेने जात होते. यावेळेस त्यांचा गाड्यांचा ताफा हा सिग्नलवर थांबला होता. यावेळेस इतर 5 गाड्यांमधून 20-25 जण आले. या सर्वांनी गाडीवर हल्ला केला.
सामंतांनी शिवसेनेसोबत गद्दारी केल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. जिथे हा हल्ला झाला, तिथपासून 500 मीटर अंतरावर युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे यांची सभा सुरु होती.