येवला प्रतिनिधी :नाशिक औरंगाबाद महामार्गावर येवला तालुक्यात असलेल्या जळगाव नेऊर येथील नाशिक जिल्हा बँकेला भगदाड पाडून बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बँकेला भगदाड पाडून बँक लुटण्याचा प्रयत्न मात्र चोरट्याचा प्रयत्न फसला आहे.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने बँकेच्या पाठीमागील बाजूस मोठे भागदाड पाडून बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र आर्थिक परिस्थिती खालावलेल्या जिल्हा बँकेत रोकडाच नसल्यामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.
या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजताच तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहाणी केले असून, पुढील कारवाई येवला तालुका पोलीस करत आहेत.