जिल्हा बँकेने जप्त केलेल्या ११३ ट्रॅक्टरांचा लिलाव

 

नाशिक :- बँकेचा सन २०२१-२०२२ कर्ज वसुली हंगाम सुरु असल्याने बँकेची एकूण २००० कोटीची रक्कम वसुलीस पात्र असून त्यापैकी रक्कम रु.१४५२ कोटीची जुनी थकबाकी आहे. चालू वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली होनेकामी व बँकेच्या खातेदारांना ठेवींची / खात्यावरील त्यांची बचतीची रक्कम उपलब्धत होणेसाठी बँकेचे प्रशासक यांनी वसुलीबाबत आढावा बैठक घेऊन.

जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई करून मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्यास सक्त आदेश दिले आहे.

त्यानुसार बँकेने जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे वारंवार थकीत कर्ज भरण्यासाठी सहकारी संस्था अधीनियम १९६० अन्वये योग्य त्या कर्ज मागणी नोटीसा देऊनही व वारंवार सौजन्याने तगादे करूनही थकीत कर्ज रक्कमेचा बँकेकडे भरणा केला नाही अश्या सन २०१६ पूर्वीच्या मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदांच्या तालुकानिहाय याद्या तयार करून अश्या थकबाकीदार सभासदांचे बँकेस प्राप्त महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१नुसार थकीत कर्ज रकमेसाठी वसुलीची कार्यवाही सुरु केली आहे.

जिल्हा बँकेची वाहन/ट्रक्टर कर्जेची मोठी थकबाकी झालेली असून त्यापैकी आजपावेतो जिल्ह्यातील एकूण २३८ वाहन/ट्रक्टर जप्त केलेले आहेत. जप्त केलेल्या ११३ ट्रक्टर/इतर वाहन यांची शासन मान्यता प्राप्त मुल्यांकनकार यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त असून त्या वाहनाचे त्यांची दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ पासून टप्प्याटप्प्याने जाहीर लिलाव ठेवण्यात आलेला आहे.

तरी जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी अशाप्रकारची कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करावे त्याचप्रमाणे सर्व प्रकारची जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर केली आहे. या योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली असून सदर योजनेत थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!