नाराज बच्चू कडूंचा ‘प्रहार’

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):-: पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप मिळून एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळात एकाही अपक्ष किंवा मित्र पक्षाला स्थान दिले गेले नाही. यावर आता प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले, की ’मी नाराज नाही पण नाराजी सरळ चेहर्‍यावर झळकत आहे. ’अडचण आहे’ असे सांगून मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले गेलें नाही. मात्र, सर्व अपक्ष एकत्र आहेत असं समजू नका, असा इशाराही त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले, की लवकरच दुसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बच्चू कडू म्हणाले, की पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये अपक्ष आणि मित्रपक्षांना स्थान द्यायला हवे होते. खरे तर अपक्ष आणि मित्रपक्षांनी मिळून हे सरकार बनले आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की महिन्याभरात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा अपक्ष आणि मित्रपक्षाचा नक्की विचार केला जाईल. काही अडचणींमुळे या टप्प्यात विचार केला नसेल. मात्र, महिन्याभरात काय होतें बघू, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!